logo

सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था

सेवा, समर्पण आणि विकासाची गाथा

सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था” ही एक सामाजिक व शैक्षणिक संस्था असून, समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमची संस्था शिक्षण, सामाजिक कल्याण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

 

 

🌿 आमचा उद्देश:

✔️ शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणे.
✔️ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.
✔️ महिलांसाठी स्वयंरोजगार आणि सक्षमीकरण उपक्रम राबवणे.
✔️ आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि वैद्यकीय मदतीसाठी उपक्रम हाती घेणे.
✔️ ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम चालवणे.

 

🌿उपलब्ध सुविधा :

✔️ शीघ्र निदान व उपचार केंद्र

✔️ स्पीच थेरेपी ची मोफत सुविधा

✔️कॉक्लीअर इम्प्लांट विषयी सर्व पूर्ण मार्गदर्शन |

✔️कर्ण यंत्राविषयी संपूर्ण मार्गदर्शन

✔️श्रवण तपासणी मोफत सुविधा

✔️संजय गांधी निराधार योजनेचे संपूर्ण मार्गदर्शन

 

🌿 आमच्या सेवा:

🔹 शैक्षणिक मदत: विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती आणि पुस्तकांची सुविधा.
🔹 महिला सशक्तीकरण: प्रशिक्षण, स्वयंरोजगार व बचतगट स्थापन करणे.
🔹 आरोग्य सेवा: आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत औषधोपचार आणि जनजागृती अभियान.
🔹 सामाजिक कार्य: गरजूंसाठी अन्नदान, वस्त्रदान आणि नैसर्गिक आपत्तीमधील मदतकार्य.

imagenew

मनोगत

सामाजिक कार्य हे केवळ जबाबदारी नसून ते माझ्यासाठी एक सेवाभाव आहे. पूर्णामाय सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी काम करणारी संस्था आहे, आणि तिच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे.

शिक्षण हा परिवर्तनाचा खरा मंत्र आहे. गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधार देण्याचा आमचा प्रयत्न असतो. महिलांसाठी स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणाच्या संधी निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनवणे, हेही आमच्या कार्यातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

आरोग्य ही सर्वांच्या हातात असावी, यासाठी आम्ही आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि मोफत औषधोपचार यासारखे उपक्रम सातत्याने राबवतो. गरजूंसाठी अन्नदान, वस्त्रदान आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य करणे, ही जबाबदारी आम्ही मनापासून पार पाडतो.

“सामाजिक परिवर्तनाच्या या कार्यात आपली साथ आणि सहकार्य अपेक्षित आहे, जेणेकरून आपण समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी एक सकारात्मक बदल घडवू शकू.”

डॉ. सौ. नयना ओमप्रकाश कडू 

Bachchu Kadu

मार्गदर्शक

आ. बच्चू कडू
(मार्गदर्शक – पूर्णामाय सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था)

आमदार बच्चू कडू हे सामाजिक कार्याचे अध्वर्यू आणि पूर्णामाय सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आहेत. सामाजिक न्याय, गरिबांचे हक्क, अपंग कल्याण, शैक्षणिक समानता आणि ग्रामीण भागातील समस्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

पूर्णामाय संस्थेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा दूरदृष्टीपूर्ण सल्ला व मार्गदर्शन आम्हाला सतत प्रेरणा देतो. समाजातील वंचित, दुर्लक्षित, आणि गरजू घटकांसाठी काम करताना त्यांच्या संघर्षशील आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा आम्हाला आधार वाटतो.

संस्थेच्या शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सेवा उपक्रमांना आ. बच्चू कडू यांचे सक्रीय पाठबळ लाभते. त्यांचे जीवनकार्य हेच संस्थेच्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे – सेवा, समर्पण आणि समाजहित.

त्यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

संस्था द्वारा संचालित

आशादीप (अनाथालय).

भूमिपुत्र फाउंडेशन.

संतसृष्टी व तिरंगा सृष्टी

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण.

दिव्यांगासाठी कर्मशाळा
(उद्योग मंदिर )

स्वयंसिद्धा (परित्यक्त्या, विधवा, निराधार स्त्रियांसाठी)

आशीर्वाद (वृद्धाश्रम)

बेंचमार्क गारमेंट्स

संस्थेचे कार्यक्रम

संस्थेच्या शाळा

Educational Logos Design

निवासी मूकबधिर प्राथमिक विद्यालय  

education

शहिद पांडुरंग यशवंत दिंडेकर निवासी मूकबधिर माध्यमिक विद्यालय

school3

श्रीमती इंदिराबाई बाबारावजी कडू निवासी मूकबधिर उच्च माध्यमिक कला व वाणिज्य महाविद्यालय

images3

श्रीमती इंदिराबाई बाबारावजी कडू  बालमंदिर

school2

पयोष्णी गुरुकुलम् प्राथमिक मराठी शाळा.