logo

सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था

भूमिपुत्र फाउंडेशन

‘भूमिपुत्र’ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था.

वऱ्हाडातील अन्नदाता आत्महत्येच्या दुष्टचक्रात अडकला आहे. या आत्महत्यांमुळे या भूमिपूत्रांच्या लेकरांवर मात्र आभाळ कोसळते. या परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवास व शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. अशा मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते

सततची नापिकी, सिंचनाची अपूरी व्यवस्था, वाढणारा कर्जाचा बोझा यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या दृष्टचक्रात अडकला आहे. या बळीराजाचे कूटूंब आत्महत्यांमुळे निराधार होत आहे. मुलांच शिक्षण, विवाह, कूटूंबाचा उदरनिर्वाह चालविणे कूटूंबातील विधवा स्त्रीला अशक्य होत आहे

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कूटूंबांना मदतीचा हात देता यावा म्हणून भूमिपुत्र फाऊंडेशन कार्यरत आहे. अचलपूर व चांदूरबाजार या दोन तहसिलमधील ७०० कूटूंबांची जबाबदारी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरूवातीला स्विकारण्यात आली आहे.

फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणारे कार्य :

■ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कूटूंबातील मुलांना शैक्षणिक मदत करणे

■ अविवाहित मुलींच्या विवाहासाठी मदत करणे.

■ कूटूंबाला स्वयंपूर्ण होता याव यासाठी लघुउद्योग उभारण्याच्या दृष्टीने मदत करणे. (उदा. कापड दुकान, शेळीपालन, पीठ गिरणी, शिवणकाम, किराणा दुकान, स्टेशनरी, दुग्ध व्यवसाय, बीज भांडवल व आवश्यक प्रशिक्षण देणे)

■ कूटूंबाला आरोग्यसेवा देणे.

■ कूटूंबाला शासकीय योजनांचा (संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजना, अन्न सुरक्षा, घरकुल) लाभ मिळवून देणे