भावी पिढीमध्ये भारतीय संत परंपरेने मानवी कल्याणासाठी दिलेला समृद्ध वैचारिक वारसा व भारतमाते
प्रति जाज्वल्य निष्ठा रुजविता यावी या उद्देशाने देशातील संत व राष्ट्र पुरुषांच्या जीवनावर आधारीत
चित्रप्रदर्शनी व अभ्यास केंद्राची उभारणी करण्याचा मानस आहे.
स्वातंत्र्य मिळवून ६६ वर्षे झाली, पण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २६ जीनवरी गणराज्य दिन ओस पडत चालली आहेत. शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्याशिवाय कोणाचीही पाऊले मनभावनेतून या राष्ट्रीय सणांकडे वळतच नाही. धार्मिक सणांना उत्साहवर्धक गर्दी, त्यातुलनेत १५ ऑगस्ट व २६ जानेवारी राष्ट्रध्वज वंदनात सामिल असलेली संख्या लक्षात घेतली तर आपलाच आपल्याला संताप येतो. हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर मिळालेले स्वातंत्र्व आपण किती लवकर विसरायला निघालो, कारण तो सण कुठल्याही धर्माचा धार्मिक सण नाही. म्हणून किमान १५ मिनीट ध्वजवंदनेकरिता घरा-घरातील प्रत्येक जाती-पाती धर्माचे महिला, पुरुष, युवावर्गांसह उपस्थित राहून तिरंग्याला राष्ट्रवंदना दिली तर शहिदांनी स्वातंत्र्याचे जे स्वप्न बघितले होते ते साकारेल. करीता आमचा आग्रहच नाही तर हट्ट आहे की, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वा दोन दिवसात तरी जिये ध्वजारोहण होत असेल अशा ठिकाणी उपस्थित राहून राष्ट्रीय सणात उत्साहाने सामील व्हा, करिता सलग ५ वर्षापासून “तिरंगा माझा” अभियान छेडतो आहे.
WhatsApp us